मुंबईत बटनवाली टॅक्सी दिसली की तोडणार : नांदगावकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

दादर, भायखळा, मुंबई सेन्ट्रल, कुर्ला, चर्च गेट, बांद्रा, एअरपोर्ट सगळीकडे प्रवाशांची लूटमार खुलेआम चालू आहे. प्रवाशांनी मीटर वर लक्ष द्या नाहीतर ३००ते ४०० रुपये जास्त उकळण्यासाठी मिटर फास्ट बटन वापरून लुटण्याचा धंदा करणारी टॅक्सी चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात यासाठी काळजी घ्यावी. उद्यापासून मुंबईत एकही टॅक्सी बटनवाली दिसली तर टॅक्सी जागेवर तोडली जाईल.

मुंबई : मुंबईतील 80 टक्के टॅक्सीमध्ये मिटर फास्ट करण्याचे बटन आहे आणि रोज हजारो प्रवाशांना लुटण्याचा धंदा खुलेआम ट्राफिक पोलिसांच्या संमतीने सुरू आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईत बटनवाली टॅक्सी दिसली रे दिसली की तोडणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वाहतूक सेनेचे महासचिव नितीन नांदगावकर यांनी दिला आहे. 

नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. नायगावकर म्हणाले, की सावधान मुंबई, सर्वांत मोठा खुलासा करतोय. उद्यापासून बटनवाली टॅक्सी दिसली रे दिसली तोडणार. मुंबईच्या रस्त्यावर काचाच काचा दिसतील जर मला टॅक्सीमध्ये बटन आढळून आले तर. दादर टर्मिनलवरच्या सर्व टॅक्सी बटनवाल्या आहेत. मिटरमध्ये बटन लावून प्रवाशांना लुटण्यापेक्षा घरा घरात दरोडे टाका, समाजकंटकांनो.

नायगावकर यांनी पुरावा देत म्हटले आहे, की दादर, भायखळा, मुंबई सेन्ट्रल, कुर्ला, चर्च गेट, बांद्रा, एअरपोर्ट सगळीकडे प्रवाशांची लूटमार खुलेआम चालू आहे. प्रवाशांनी मीटर वर लक्ष द्या नाहीतर ३००ते ४०० रुपये जास्त उकळण्यासाठी मिटर फास्ट बटन वापरून लुटण्याचा धंदा करणारी टॅक्सी चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात यासाठी काळजी घ्यावी. उद्यापासून मुंबईत एकही टॅक्सी बटनवाली दिसली तर टॅक्सी जागेवर तोडली जाईल. ट्राफिक पोलिस तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सर्वसामान्य जनतेच्या मेहनतीच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या समाजकंटकांना तुम्ही पोसता. बंद करायचे ताबडतोब नाहीतर नुसती टॅक्सी नाही तर तुमच्या सगळ्यांची वरात काढणारच.
माझा शब्द यापुढे मुंबईत लुटमारीचे धंदे बंद करायचे नाहीतर टॅक्सी भंगारात दिसेल.
जनतेने टॅक्सीमध्ये बसल्यावर मीटरकडे लक्ष द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Nitin Nandgaonkar targets taxi driver in Mumbai