निवडणुका आता झाल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही; फडणवीस-राज भेटीनंतर मनसेचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आज भेट दिली.

'निवडणुका आता झाल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी आज भेट दिली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलंय.

देशपांडे पुढे म्हणाले, एखादं नवीन घर आपण खरेदी करतो अथवा बांधतो, तेव्हा मित्रमंडळींना जेवायला घरी बोलवत असतो. फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट कौटुंबिक आहे. त्यांच्या भेटी दरम्यान आतमध्ये काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही. आजची भेट केवळ त्यांना घरी जेवायला बोलावण्यासाठी होती, त्यामुळं या भेटीचा दुसरा अर्थ काढण्याची काही गरज नाही. याआधी क्रिकेटर सचिन तेंडुलकर देखील राज साहेबांच्या घरी आला होता. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार, प्रसाद लाड हे देखील राज साहेबांना भेटून गेले आहेत, ते त्यांचे मित्र आहेत.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही'

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. देशपांडे म्हणाले, मुंबई पालिकेच्या निवडणुका घ्यायच्या की नाही, हे सरकार ठरवत आहे. सध्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्लॅन आहे. निवडणुका आता जरी घेतल्या तरी शिवसेना, राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही. त्यामुळं या निवडणुसाठी मनसेची तयारी व्यवस्थितरित्या सुरू आहे. मुंबई पालिका मनसे जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिवाळीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाशिकमध्ये भेट झाली होती. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे, असं समजतंय. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

loading image
go to top