देशपांडे, धुरींवर अटकेची टांगती तलवार कायम! पळून जाणं भोवलं

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.
Sandeep Deshpande MNS Leader
Sandeep Deshpande MNS LeaderSakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करत होती, त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन मनसैनिक फरार झाले. हे दोघे म्हणजे संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande and Santosh Dhuri)आणि संतोष धुरी अद्याप फरार आहेत. दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली.

मुंबई सत्र न्यायालयात संदीप देशपांडे आणि धुरी यांच्या कडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे अद्यापही फरार आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान या प्रकरणार मुंंबई सत्र न्यायालयाने दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात आज तरी या दोघांना दिलासा मिळणार नाही. या प्रकरणाची पुढची सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.

Sandeep Deshpande MNS Leader
Sandeep Deshpande: संदीप देशपांडेचा मुंबई पोलिसांना चकवा

काय आहे प्रकरण?

मनसेने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. यावेळी मनसेकडून भोंग्यांच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. मनसेचे अनेक पदाधिकारी पोलिसांना सापडत नव्हते. त्यात संदीप देशपांडेंचा समावेशही होता. अखेर राज ठाकरेंच्या निवासस्थानी देशपांडे आले आणि त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात पोलिसांच्या हाती तुरी देऊन संदीप देशपाडेंसह संतोष धुरी यांनीदेखील पळ काढला. या गोंधळात एका महिला पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com