मनसेचा ठाकरे सरकारवर घणाघात, सरकार 'चिप टॅक्टिक्स' करतेय..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मुंबई - मुंबईत उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला महामेळावा पार पडतोय. या मेळाव्यातून महाराष्ट्र नवनिर्माण  सेना आपली राजकीय भूमिका बदलणार असल्याचं बोललं जातंय. उद्या होणाऱ्या महामेळाव्यातून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्यावर येत्या काळात राजकारण करताना पाहायला मिळतील असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठ्या प्रमाणात मनसैनिकांना का कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामेळाव्यात मनसेचा बदललेला झेंडा देखील पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाकडे झेंड्याचे दोन डिझाइन्स पाठवले आहेत. यामध्ये एका झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आहे तर दुसऱ्यामध्ये शिवमुद्रेवर मनसेचं इंजिन दाखवण्यात आलं आहे. दरम्यान यावरून देखील आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी मनसेने शिवमुद्रेचा वापर झेंड्यावर करू नये अशी भूमिका घेतली आहे. 

अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला टीव्हीवर लोकांनी पाहू नये म्हणून MSEB  मुद्दामून वीज बंद ठेवणारा असल्याचा आरोप मनसेचे धडाडीचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मनसेच्या महामेळाव्याचं प्रसारण रोखण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचा एक फोटो देखील शेअर केलाय.

विशेषतः ग्रामीण भागात अनेकांना उद्या वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. असं करून सरकारला काहीही साध्य होणार नाही. अशा पद्धतीच्या चिप टॅक्टिक्स सरकार करतंय, ज्याचा काही फायदा होणार नाही असं संदीप देशपांडे म्हणालेत. दरम्यान, याबद्दलचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सक्षम असल्याचं देखील संदीप देशपांडे म्हणालेत.  

mns leader sandeep deshpande says government is playing cheap tactics against MNS

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader sandeep deshpande says government is playing cheap tactics against MNS