बोलाची कढी बोलाचा भात, मनसेची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

पूजा विचारे
Wednesday, 13 January 2021

टेस्ला कंपनीनं महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईः  इलेक्ट्रिक कारची  निर्मिती करणारी 'टेस्ला' कंपनीनं अखेर भारतात एन्ट्री केली. आपल्या प्रकल्पासाठी टेस्लानं आयटी हब असलेल्या बंगळुरु शहराची निवड केली आहे.  टेस्ला कंपनीनं महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन आपल टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती दिली होती.  आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तसंच आदित्य यांनी या भेटीनंतर टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रातच येईल, असा विश्वासही व्यक्त केला होता. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावर आता मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी खोचक असं ट्विट केलं आहे. टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात", असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. 

टेस्ला कंपनीसोबत चर्चा अयशस्वी

आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 ला प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लानं भारतात पदार्पण केलं आहे.  कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे.

हेही वाचा- हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील,  सचिन सावंत यांची खोचक टीका

 MNS leader sandeep deshpande targets aditya thackeray tesla india entry bangalore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader sandeep deshpande targets aditya thackeray tesla india entry bangalore