esakal | मध्य प्रदेशातील मंदिरात देवदर्शन केल्यानंतर मनसे आमदार म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य प्रदेशातील मंदिरात देवदर्शन केल्यानंतर मनसे आमदार म्हणाला...

मध्य प्रदेशातील मंदिरात देवदर्शन केल्यानंतर मनसे आमदार म्हणाला...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मंदिर बंद (maharashtra temple) आहेत. मंदिर बंद ठेवण्यामागे कोरोनाचं (corona) कारण ठाकरे सरकाकडून (thackeray govt) दिलं जातय. मंदिर उघडल्यास, कोरोनाचा फैलाव होईल, अशी भीती सरकारला वाटते. त्यामुळे महाराष्ट्रात अजून मंदिर बंदच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या भाजपा, मनसेने (mns) मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. सोमवारी भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या मंदिरांबाहेर शंखनाद आंदोलन केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मंदिर उघडा, अन्यथा घंटानांद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठाकरे सरकारवर हिंदू विरोधी असल्याचा आरोप होतोय. महाराष्ट्रात मंदिर बंद असताना मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी शेजारच्या मध्य प्रदेशात जाऊन मंदिरात देव दर्शन केले आहे. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार असून ते कल्याण ग्रामीण मधून निवडून आले आहेत.

हेही वाचा: आता करा 'गुगल पे'वरुनच एफडी...पण कोणत्या बँकेत? जाणून घ्या

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मध्यप्रदेशचा कोरोना आणि महाराष्ट्राचा कोरोना वेगळा आहे का? असा सवाल त्यांनी टि्वटमधून विचारला आहे. मंदिर उघडी ठेवण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारचे कौतुक केले आहे. मंदिरातील देवदर्शनाचे फोटोही त्यांनी पोस्ट केलेत.

loading image
go to top