उद्धव यांना सभागृहात राज ठाकरेंचा पाठिंबा नाही; मनसे तटस्थ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

मुंबई : महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप विरोधात महाविकासा आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडेच 119 आमदारांचे पाठबळ नसल्याचा दावा महाविकास आघाडीनं केलाय. त्यातच मनसेचा एकमेव आमदार तटस्थ राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुंबई : महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप विरोधात महाविकासा आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडेच 119 आमदारांचे पाठबळ नसल्याचा दावा महाविकास आघाडीनं केलाय. त्यातच मनसेचा एकमेव आमदार तटस्थ राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

उद्धव ठाकरे यांच्या बहुमत चाचणीच्या दिवशी आज सकाळपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपनं हिंमत असेल तर, गुप्त मतदान घ्या असे आव्हान महाविकास आघाडीला दिले आहे. त्यावर महाविकास आघाडीनंही आक्रम पवित्रा घेत भाजप दावा करत असलेले 119 आमदारही त्यांच्याकडं नसल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व आमदार विधिमंडळ सभागृहात पोहोचले आहेत. तिन्ही पक्षांनी आमदारांना व्हीप बजावला आहे. दरम्यान, राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधिमंडळ बहुमत चाचणीत तटस्थ राहणार आहेत. विधिमंडळात जाण्यापूर्वी राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बहुमत चाचणीत तटस्थ राहणार असल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय.

चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

उपमुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स
मुख्यमंत्रिपद शिवसेनेला, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला तर, उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर केली. तर, उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी कडून अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच अंतिम निर्णय घेतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आमदारांचे मोबाईल बंद म्हणता, तर मग त्यांना संपर्क का करताय? : जयंत पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS MLA Raju Patil to be neutral in confidence vote for cm Uddhav Thackeray