मनसेचे एकमेव आमदार अजित पवारांच्या भेटीला...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

मुंबई - महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आठवतेय का ? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का ? मला विरोधी बाकावर बसावा, असा जोगवा मागत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला साद घातली होती. अशात निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदाराला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. हे आमदार आहेत  राजू पाटील.

मुंबई - महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आठवतेय का ? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आठवत नसेल असा कुणीही कदाचितच असेल. बरं यामध्ये राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला स्टॅन्ड आठवतोय का ? मला विरोधी बाकावर बसावा, असा जोगवा मागत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला साद घातली होती. अशात निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदाराला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं. हे आमदार आहेत  राजू पाटील. कल्याण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. याच एकमेव  मनसे आमदारानी आता थेट राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. 

मोठी बातमी - आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..

भाजप आणि मनसेची युती होणार अशा चर्चा आहेत. अशात राजू पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात, राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय.  

कल्याण डोंबिवली विधानसभा मतदार संघातून राजू हे निवडून आलेत. दरम्यान, याचबाबत आमदार राजू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीये. काही दिवसातच महाराष्ट्राचं बजेट सादर केलं जाणार आहे. दरम्यान २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची  मागणी राजू पाटील यांनी केलीये आणि यासाठी महाराष्ट्रातील बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.   

"उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची आज भेट घेतली. यामध्ये  २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी आणि २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी", अशी मागणी राजू पाटलांनी केली आहे. 

मोठी बातमी -  अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि धडकी भरवणारी दरी, अडीच वर्षांच्या तिने सर केला कलावंतीण

 

राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आहेत. हे तेच आमदार आहेत जे निवडून आल्यावर राज ठाकरे यांनी त्यांना स्वतःच्या खर्चित बसायला सांगितलं होते, जे राजू यांनी टाळलं. शेवटपर्यंत मनसेमध्येच राहणार असं वक्तव्य देखील राजू यांनी यापूर्वीच केलंय.  

MNS MLA raju patil met NCP leader and maharashtra deputy CM ajit pawar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS MLA raju patil met NCP leader and maharashtra deputy CM ajit pawar