कांजूरमार्गच्या हुमा सिनेमागृहात मनसेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कांजूरमार्ग पश्चिम येथील हुमा सिनेमागृहात मंगळवार (ता.7) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बाहेरील खाद्यपदार्थ समोसा, वडापाव सिनेमागृहात वाटण्यात आले व संबंधित व्यस्थापनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
 

मुंबई- मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाच्या दर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या खळखट्याक आंदोलनाची दखल विधीमंडळात घेण्यात आली होती. त्यानंतर मल्टिप्लेक्स मॉलमधील खाद्यपदार्थाचे दर कमी करणे तसेच, बाहेरील खाद्यपदार्थ मॉलमध्ये घेवून जाण्याचा निर्णय एकमताने विधीमंडळात पारित करण्यात आला असतानाही अनेक मॉल, सिनेमागृहात या निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

त्याविरोधात, मनसैनिक पुन्हा आक्रमक झाले असुन कांजूरमार्ग पश्चिम येथील हुमा सिनेमागृहात मंगळवार (ता.7) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बाहेरील खाद्यपदार्थ समोसा, वडापाव सिनेमागृहात वाटण्यात आले व संबंधित व्यस्थापनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हुमा सिनेमातील व्यसस्थापकाशी बोलून सर्व खाद्यपदार्थ दर कमी करा व बाहेरील खाद्यपदार्थास सिनेमा गृहात नेण्यास मज्जाव करू नये असे संतप्त आदेश देखील मनसेच्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिले.

Web Title: MNS movement in Huma Cinema Hall of Kanjurmarg