मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नालासोपारा -  येथील मनसे वाहतूक सेनेच्या उपशहर संघटकास पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (ता. 5) घडला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिल्याने येथील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

विरार पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 4) रात्री पोलिस मित्रचे अर्ज भरण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गेले होते. त्यांनी आपली वाहने एका बाजूला रस्त्यावर ठेवली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी येथील एक रिक्षा बाजूला घेत ती पोलिस ठाण्यात जमा करण्यास घेतली; मात्र ती आमची रिक्षा आहे. आम्ही पोलिस ठाण्याचे काम झाल्यावर ती घेऊन जातो, असे मनसैनिकांनी पोलिसांना सांगितले; मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न देता रिक्षावाल्यांना माज आला आहे, असे उद्गार काढत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी सुरेश केशव खरात याने केला आहे. या प्रकरणाची 15 दिवसांत चौकशी करून मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा 24 डिसेंबरपासून विरार पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन मनसेने पोलिसांना दिले आहे. 

या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. 
- जयंत बजबळे, पोलिस उपविभागीय अधिकारी, विरार पोलिस ठाणे 

Web Title: MNS office beat from police