मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? पाहा टीझर : MNS Padava Melava | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray_MNS Gudhi Padava Melava

MNS Padava Melava: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? पाहा टीझर

मुंबई : येत्या गुढी पाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचा टिझर मनसेकडून लॉन्च करण्यात आल आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच राज ठाकरे यावर नक्की काय भाष्य करणार याकडं यामुळं लक्ष लागून राहिलं आहे. (This is not politics teaser launch of MNS Padwa rally at Shivaji Park Mumbai)

मनसेनं सभेचा टीझर आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. यामध्ये आवाहन करण्यात आलंय की, "महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी... चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई"

दरम्यान, चाळीस सेकंदाच्या या टिझरमध्ये सुरुवातीला विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडितील शब्द अक्षऱात दिसतात, त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का...महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे!

पुढे राज ठाकरेंच्या फोटोसह 'महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज...' असल्याचं टायटल दिसतं. तसंच पुढे 'चला शीवतीर्थावर!' असं आवाहनही मनसेच्यावतीनं करण्यात आलं आहे.