Vidhan Sabha 2019 : 'तुमचा बाप आला तरी...'; मुख्यमंत्र्यांना मनसैनिकांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

आम्हाला सिंधी नागरिक, संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. सिंधी बांधव तसेच सर्व भाषिक-प्रांतिक नागरिक येथे गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना मुख्यामंत्र्यांनी भाषिक वाद उकरून काढला आहे​.

उल्हासनगर : 'उल्हासनगरातून मेट्रो धावणार असून येथील मेट्रो स्थानकाचे नाव सिंधुनगर ठेवण्यात येणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.11) केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काळे कपडे घालून निषेध केला.

''तुमचा बाप जरी आला तरी उल्हासनगरचे सिंधुनगर असे नामकरण होऊ देणार नाही,'' असा मनसे इशारा दिल्याने पुन्हा एकदा सिंधुनगर नामकरणाचे प्रकरण पेटणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

- INDvsSA : दक्षिण आफ्रिकेचा कडवा प्रतिकार; भारताला डाव गुंडाळण्याचे समाधान

अंबरनाथ विधानसभा मतदार संघात उल्हासनगर पूर्व मधील सुमारे 19 वॉर्ड येतात. या वॉर्डमध्ये मनसेचे उमेदवार सुमेध भवार यांच्या प्रचारासाठी कंबर कसली असतानाच, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुनगर वक्तव्याचे पडसाद उमटले. उल्हासनगरातील मनसेचे स्थानिक नेते सचिन कदम, प्रदिप गोडसे, संजय घुगे, बंडू देशमुख, सागर चौहान, वैभव कुलकर्णी यांनी काळ्या कपड्यात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सुभाष हटकर उपस्थित होते.

उल्हास नदी येथूनच वाहत असल्याने या शहराचे नाव उल्हासनगर ठेवण्यात आले. आम्हाला सिंधी नागरिक, संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. सिंधी बांधव तसेच सर्व भाषिक-प्रांतिक नागरिक येथे गुण्यागोविंदाने एकत्रित राहत असताना मुख्यामंत्र्यांनी भाषिक वाद उकरून काढला आहे, असा आरोप मनसैनिकांनी केला.

Image may contain: 6 people, people standing

- Vidhan Sabha 2019 : 'तुम्ही मत देणार की मुलगी?'; भाजप बंडखोराचे वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, सिंधुनगर नामांतराच्या मागणीचा वाद सुमारे 30 वर्ष जुना आहे. 1990 साली नामांतराच्या समर्थनार्थ खासदार राम कापसे यांची सभा सिंधु यूथ सर्कलमध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हा शिवसेना शहर प्रमुख रमेश मुकणे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप मालवणकर, सुरेंद्र सावंत, प्रकाश सावंत आदी शिवसैनिकांनी ही सभा उधळली होती. वय 72 झाले असले तरी आजही उल्हासनगरच्या नामकरणाचा मुद्दा उकरून काढला, तर त्याविरोधात मैदानात उतरणार, असे रमेश मुकणे यांनी स्पष्ट केले आहे.

- ऐश्वर्यासह दिसली 'कुछ कुछ होता है' मधील अंजली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS party workers of Ulhasnagar alerts to CM Devendra Fadnavis