शिवसेनाभवन परिसरात लागले राज ठाकरेंचे बॅनर्स, दादर झालं भगवं..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे चिन्ह आहेत. राज ठाकरे भगवा झेंडा हाती घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. २३ जानेवारीला मनसेच पहिलंच अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी मनसेकडून दादर आणि शिवसेनाभवन परिसरात आज जोरदार पोस्टरबाजी  केलीये. 

शिवसेनाभवन परिसरात राज ठाकरेंचे भगव्या रंगात असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडी आणि शिवसेना यांना डिवचण्यासाठी ही पोस्टर बाजी केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

मोठी बातमी - "संजय राऊतांची फक्त १० मिनिटं सुरक्षा काढा, मग बघा काय होतं.."

काय लिहिलय त्या पोस्टरवर

"सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट" अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आलाय. त्यामुळे सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेलेल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. विशेष म्हणजे हे संपूर्ण पोस्टर भगव्या रंगात आहे त्यामुळे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार हे आता निश्चित आहे.

मोठी बातमी - दाऊदला तुडवणारा 'करीम लाला' होता तरी कोण?

मोठी बातमी - त्या 'लकी' कॉईनने दिला एजाज लकडवालाला पुनर्जन्म; वाचा नक्की काय घडले

पोस्टरबाजीवर काय म्हणाले मनसेचे नेते संदीप देशपांडे

 "ज्या महाराष्ट्र धर्मासाठी मनसे सतत लढा देत आली आहे, त्या महाराष्ट्र धर्मावर जेव्हा संकट येतं तेंव्हा मनसे सतत लढा देत असते. जेव्हा वेळ येईल त्या प्रत्येक वेळी मनसे महाराष्ट्र धर्मासाठी लढा देईल" असं संदीप देशपांडे म्हणाले. मात्र याच वेळी भगव्या रंगाच्या पोस्टर बद्दल उत्तर देण्यास देशपांडेंनी टाळाटाळ केली.

मोठी बातमी -  "संजय राऊत यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंना मान्य ?"

भाजपसोबत जाण्याबाबत काय म्हणाले मनसेचे नेते

मनसे भाजपसोबत जाऊन भगवा हाती घेणार का? हा प्रश्न सतत मनसे नेत्यांना विचारला जातोय. मात्र, याबद्दलचा निर्णय राज ठाकरे घेतील. सध्यातरी अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, असं सतत मनसे नेत्यांकडून सांगण्यात येतय. मात्र दादरमध्ये होत असलेल्या या पोस्टरबाजीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

mns puts banners all over dadar with the image of raj thackeray and saffron background         

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns puts banners all over dadar with the image of raj thackeray and saffron background