अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, नाहीतर....मनसेचा अॅमेझॉन-फ्लिपकार्टला इशारा

पूजा विचारे
Friday, 16 October 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला इशारा देत दोन कंपन्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. 

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला इशारा देत दोन कंपन्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. 

सात दिवसांच्या आता जर दोन्ही कंपन्यांनी आपल्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला नाही तर मनसे स्टाईल समाचार घेऊ, अशा इशारा मनसेनं दिला आहे. 

मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसला गुरुवारी भेट दिली. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या मुंबईतील बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी मनसे नेता अखिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले.

या दोन्ही कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देत त्यांच्या भाषेत अ‍ॅप सुरु केलंय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठीत हे अॅप सुरु करावं अन्यथा मनसे स्टाईल दिवाळी साजरी होईल असा इशाराही दिलाय.

आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव्ह सेल सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रॉडक्ट्सवर मोठी सूट दिली जाणार आहे. त्याशिवाय दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या डिल्स रिव्हील करण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉन 16 ऑक्टोबरपासून प्राईम मेंबर्ससाठी तर 17 ऑक्टोबरपासून नॉन प्राईम मेंबर्ससाठी महिन्याभराच्या फेस्टिव्ह सेलचं आयोजन केलं आहे.

mns raj thackeray marathi language amazon and flipkart akhil chitre


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns raj thackeray marathi language amazon and flipkart akhil chitre