मनसेने जारी केलेला 'हा' व्हिडीओ पाहिला का ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या ९ तारखेला मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता एक व्हिडीओ जारी करण्यात आलाय. हा व्हिडीओच्या माध्यमातूम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येतंय. "अजून किती वेळ गाफील राहणार आहोत?" या मथळ्याखाली मनसेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडीओ  शेअर केलाय.

मोठी बातमी - 'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

काय म्हटलंय या व्हिडीओमध्ये. 

ही लढाई आहे मोहल्ल्यांमधून भारत विरोधात कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात, ही लढाई आहे देशाला पोखरणारी वाळवी उखडून टाकण्यासाठी.. या मोहल्ल्यांचा आणि अंड्यांचा भाविषयात महाराष्ट्राला त्रास होणार,असं राज ठाकरे सांगतायत.  

मोठी बातमी -  नवी मुंबईत अजित पवार आक्रमक, कार्यकर्त्यांना म्हणालेत..

येत्या ९ तारखेला म्हणजेच रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महामोर्चा काढणार आहे. या रॅलीच्या मार्गावरून मधल्या काळात तणाव निर्माण झालेला. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरीही मोर्चा निघणारच अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली होती. दरम्यान गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान व्हाया हिंदू जिमखाना असा आता मनसेच्या मोर्चाचा मार्ग असणार आहे. 

मोठी बातमी - नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन... 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांविरोधात आक्रमक झालीये. पनवेलमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केलेली. अशात आता येत्या ९ तारखेच्या मोर्चासाठी हा व्हिडीओ जारी करून वातावरण निर्मिती केली जातेय. स्वतः राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ९ तारखेला दुपारी १२ बारा वाजता हा मोर्चा निगणार आहे. 

MNS releases new video on the occasion of rally against illegal pakistani and bangladeshi immigrants

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS releases new video on the occasion of rally against illegal pakistani and bangladeshi immigrants