मनसेचे लक्ष्य शिवसेना-भाजप!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - मनसेने शिवसेना-भाजपच्या विरोधात व्हॉट्‌सॲपवरून आघाडी उघडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरूनच मनसेने त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दहिहंडी या मुंबईच्या पारंपरिक खेळावरून भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. 

शिवसेना, भाजपबरोबरच मनसेनेही मराठी मुद्द्याला हात घातला आहे. यात फक्त भाजपलाच लक्ष्य केले जात नसून, शिवसेनेचाही समाचार घेतला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून भाजपला लक्ष्य केले होते. तोच धागा पकडून मनसेने शिवसेनेला व्हॉट्‌सॲपवर टार्गेट केले आहे. दहिहंडीवरील निर्बंधांवरून मनसे व्हॉट्‌सॲपवर मेसेज व्हायरल करत शिवसेनेसह भाजपलाही लक्ष्य करत आहे. 

Web Title: MNS Target shiv sena & bjp