'ऐ दिल है...' दाखवल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ - मनसे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

मुंबई - उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना व त्यांनी काम केलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला विरोध केल्यावर आता मनसेने मल्टिप्लेक्‍स मालकांना इशारा दिला आहे. "ऐ दिल है मुश्‍कील‘ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. करण जोहरनिर्मित या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून "यूए‘ प्रमाणपत्र मिळाले असून, तो 28 ऑक्‍टोबरला प्रदर्शित होणार आहे. 
 
इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे; तसेच सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट दाखवणार नसल्याचे जाहीर केले असल्याने सिंगल स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यातच आता मनसेने मल्टिप्लेक्‍स मालकांना दिलेल्या इशाऱ्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. मल्टिप्लेक्‍स मालकांनी "ऐ दिल है मुश्‍कील‘ चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी मनसेने केली आहे; तरीही हा चित्रपट प्रदर्शित केला, तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ. मल्टिप्लेक्‍सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरू नका, अशा शब्दांत खोपकर यांनी मल्टिप्लेक्‍स चालकांना इशारा दिला आहे. 

माझे देशावर खूप प्रेम आहे; पण प्रत्येक वेळी कलाकारांना दोष देणे चुकीचे आहे. कुणीतरी म्हटले आहे की, कलाकारांचा धर्म हा त्याची कला आहे आणि दोन देशांतील तणावासाठी कलाकारांना आपण जबाबदार ठरवू शकत नाही. 
- प्रियांका चोप्रा, अभिनेत्री 

Web Title: MNS warns theater owners against screening of Ae Dil Hai Mushkil