उल्हासनगरात मनसेचा सामाजिक उपक्रमांचा धडाका

दिनेश गोगी
शनिवार, 16 जून 2018

उल्हासनगर : एकही नगरसेवक नसलेल्या उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या  50 व्या अर्थात गोल्डन ज्युबिली वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रमांचा धडाका लावताना ठाकरे यांचा वाढदिवस नावचैत्यन्याच्या वातावरणात साजरा केला आहे. 

मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख व मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने कॅम्प 5 येथिल स्वामी शांती प्रकाश वृध्द आश्रमातील 100 वृध्दांना चादर व खाऊ वाटप करण्यात आले. 

तसेच शासकिय वस्तिगृहातील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना वहया व शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. याच वस्तीगृहात व स्वामी शांती प्रकाश शाळेच्या आवारात  50  झाडांच वृक्षरोपणही करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे, शैलेश शिर्के तसेच मैनउद्दिन शेख, शैलेश पांडव, गोपी मयेकर, बापू कारकर, प्रबुध्द होवाळ, निखिल पाटील, वैभव कुलकर्णी, गणेश आठवले, सागर ढगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे यांनी विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बघून लालचक्की चौकात शासकीय दाखले वाटपांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे शेकडो विद्यार्थी सहज दाखले मिळाल्याने सुखावून गेले होते. तत्पूर्वी मनसे कामगार संघटनेचे उल्हासनगर पालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या उपस्थितीत दुचाकीस्वारांना एका लिटरमागे 4 रुपये पेट्रोल स्वस्तचा तोहफा देण्यात आला होता.
 
Web Title: MNS's social activities in Ulhasnagar