चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

काल झालेल्या चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडा घालणाऱ्या 33 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी आता ही कारवाई केली आहे. काल झालेल्या राड्यात पोलिसांची कारवाई राड्यात 7 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घालत त्यांना जाब विचारलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं 

काल झालेल्या चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडा घालणाऱ्या 33 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी आता ही कारवाई केली आहे. काल झालेल्या राड्यात पोलिसांची कारवाई राड्यात 7 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घालत त्यांना जाब विचारलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं 

काय आहे प्रकरण 

चेंबुरमध्ये संतप्त जमावानं काल राडा केला होता. आधी या जमावानं रास्ता रोको केला त्यानंतर पोलिसांना मारहाण केली. चेंबुरमधून एका मुलीचं अपहरण झालं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. मात्र पोलिस या प्रकरणाचा योग्य रित्या तपास करत नाहीत असा आरोप इथल्या लोकांनी केलाय. त्यामुळे जमावानं सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला. यावेळी काही वाहनांची तोडफोडही कऱण्यात आली होती. जमावाला रोखण्यासाठी इथं काही पोलिस आले तेव्हा या पोलिसांनाही धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. एकंदरीतच याठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. 

नेहरूनगर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याच्या भावनेमुळे निराश झालेल्या पित्याने मागील रविवारी (ता. 13) लोकलखाली आत्महत्या केली. या मुलीचा अद्याप शोध न लागल्यामुळे मंगळवारी (ता. 22) चेंबूर येथे स्थानिकांचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले; तसेच एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहा कर्मचारी जखमी झाले. ठिय्या आंदोलन करणाऱ्या जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. 

ठक्कर बाप्पा वसाहत परिसरातून सात महिन्यांपूर्वी एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिचे वडील पंचम राठाडिया यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली; मात्र मुलीचा शोध न लागल्यामुळे त्यांनी निराश होऊन 13 ऑक्‍टोबरला लोकलखाली आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करणे भाग पाडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती; परंतु या प्रकरणातील आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. राजावाडी रुग्णालयात 10 दिवस ठेवण्यात आलेला त्यांचा मृतदेह मंगळवारी कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. 

राठाडिया यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चरई स्मशनाभूमीत नेला जात असताना अंत्ययात्रेतील काही जणांनी छगन मिठा पेट्रोल पंपानजीक शीव-पनवेल मार्गावर ठिय्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परिणामी परिसरातील वातावरण अधिकच तापले. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी कुर्ला सिग्नलवर वाहतूक रोखली आणि शीव-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड करत काही पोलिसांनाही मारहाण केली. 

Webtitle : mob attacked cops in chembur case registered against 150 people 33 under arrest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob attacked cops in chembur case registered against 150 people 33 under arrest