मोबाईल इंटरनेट सेवा आजही बंदच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

नवी मुंबई - मराठा समाजाच्या आंदोलनानंतर गुरुवारी कळंबोली परिसरातील जनजीवन सुरळीत झाले. मात्र, कोपरखैरणे परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी दिवसभर आंदोलकांची धरपकड केली. कळंबोलीत 35, तर कोपरखैरणेत 47 आंदोलकांना अटक करण्यात आली. दरम्यान, शहरात अफवा पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली. उद्याही सायंकाळपर्यंत इंटरनेट बंद राहण्याची शक्‍यता आहे.

कळंबोलीसह कामोठे, खांदेश्‍वर, पनवेल शहर, खारघरमध्येही पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. बुधवारी रात्रीपासून सुरू केलेल्या धरपकडीत काही अल्पवयीन मुलेही होती. कळंबोलीत गुरुवारी सर्व शाळा आणि दुकाने सुरू होती. मात्र, नवी मुंबईत तणावपूर्ण शांतता होती. आंदोलनात दोन गटांच्या हाणामारीत बुधवारी जखमी झालेल्या तोडकर नामक माथाडी कामगाराचा गुरुवारी जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी दुपारी बंद मागे घेतल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केल्यानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत कळंबोली आणि कोपरखैरणे परिसरात अधूनमधून दगडफेक सुरू होती. 

Web Title: Mobile Internet services remain closed today