मोबाईल चोर अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

चेंबूर - सुभाषनगरमधील अफक शाळेजवळ पहाटे चालण्यास गेलेल्या तरुणाला बांबूने मारहाण करून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या चोराला गोवंडी पोलिसांनी तब्बल एक महिन्यानंतर टिटवाळा येथून अटक केली. 

चेंबूर - सुभाषनगरमधील अफक शाळेजवळ पहाटे चालण्यास गेलेल्या तरुणाला बांबूने मारहाण करून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या चोराला गोवंडी पोलिसांनी तब्बल एक महिन्यानंतर टिटवाळा येथून अटक केली. 

खारदेवनगर महापालिका वसाहतीत राहणारे सफाई कामगार विनायक जाधव (वय ३०) हे ३१ मार्चला पहाटे चारच्या सुमारास मार्टीन हाऊस, अफक शाळा येथून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना पाठीमागून बांबूने जबर मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन ते पसार झाले. याबाबत जाधव यांनी गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या चौकशीत शिवाजीनगर येथील स्वप्निल साळवे (वय ३०) याच्यावर संशयाची सुई वळली. त्यानुसार पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या पथकाने टिटवाळ्याला मावशीकडे गेलेल्या स्वप्निलला ताब्यात घेतले. स्वप्निलवर यापूर्वी गोवंडी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Mobile thief arrested