esakal | भिवंडीत मोबाईल चोराला अटक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भिवंडीत मोबाईल चोराला अटक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना हेरून कधी दुचाकीवरून येऊन, तर कधी रिक्षातून येऊन मोबाईल चोरून तो पसार व्हायचा. एका सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला आणि मानपाडा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे भिवंडी येथून चोराला बेड्या ठोकल्या. सुफीयान ऊर्फ सद्दो मलीक बागवान (वय २५) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३३ मोबाईल व एक रिक्षा पोलिसांनी जप्त केली.

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील रामकुमार सिंह (वय ४८) हे वॉचमनची नोकरी करतात. २२ ऑगस्टला सकाळी ते एमआयडीसी फेज-दोनमध्ये जाण्यासाठी पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळ काढला होता.

हेही वाचा: डोंबिवली - शीळ रस्त्यावरील मानपाडा चौकात निदर्शने

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही आणि मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश वनवे, हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, पोलिस नाईक दीपक गडगे, भारत कांदळकर, प्रवीण किनरे, यलप्पा पाटील यांच्या पथकाने नवी वस्ती परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे सुमारे ३३ मोबाईल व रिक्षा जप्त केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

loading image
go to top