मोदींची पुन्हा तुलना छत्रपतींशी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दिल्ली विधानसभेच्या निकालावर केले अजब ट्विट

मुंबई ः काही तासांपूर्वीच दिल्ली विधानसभेचे निकाल समोर
आले असून यात आपने दमदार विजय मिळवत भाजपला धूळ 
चारली आहे.

हेही वाचा - दिल्ली निकालानंतर वाचा काय म्हणतात उद्धव ठाकरे

दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या उमा भारती
यांनी मोदींना थेट छत्रपती हीच उपमा दिल्याने समाज माध्यमांवर 
खळबळ उडाली आहे.

याआधी देखील आपल्या अनेक विधानांमुळे चर्चेत आलेल्या उमा भारती
यावेळी मात्र स्वत:सह पक्षाच्य़ा अडचणीत वाढ करणार असे चित्र दिसून येत आहे. दिल्ली विधानसभेचे निकाल समोर आल्यानंतर उमा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका ट्विटमध्ये मोदी यांनी सर्व देशाच्या जनतेला आत्मसात केलं आहे आणि मोदींनी जनतेला आत्मसात केले आहे असे लिहले असून पुढे छत्रपती मोदी जिंदाबाद असे म्हटले आहे.

 

web title : modi is like Chhatrapati said by this BJP leader

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi is like Chhatrapati said by this BJP leader