आव्हाने पेलण्यात मोदी सरकार अपयशी : पी. चिदंबरम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी ठरले असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले. 

मुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी ठरले असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले. 

निवडणुकीचा जाहीरनामा निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेसने देशातील महत्त्वाच्या ठिकाणी जनतेकडून मुद्दे जाणून घेण्यास प्रारंभ केला आहे. आज या मालिकेचा पहिला भाग मुंबईत वांद्रे येथे पार पडला. मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार कुमार केतकर यावेळी उपस्थित होते. पी. चिदंबरम जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला कोणते प्रश्‍न महत्त्वाचे वाटतात, याचा आढावा घेतल्यास आम्हाला देशभरात हे तीन प्रश्‍न महत्त्वाचे वाटतात. 

मुंबईतील जनतेने पूर्ण न झालेली आश्‍वासने, भ्रष्टाचार, आरोग्य या समस्यांबाबत कॉंग्रेसने जाहीरनाम्यात काहीतरी करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. सुमारे 70 जणांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत आपल्या मागण्या मांडल्या. देशात ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधून याबद्दलची मते जाणून घेतली जाणार आहेत. या सर्व मुद्द्यांचा विचार करून जाहीरनामा तयार केला जाईल. यावेळी उपस्थितांनी कॉंग्रेसकडे विकल्प म्हणून पाहायचे असेल तर पक्षाने सातत्य ठेवले पाहिजे, अशी सूचना केली. 

Web Title: Modi government fails to meet challenges P Chidambaram