राष्ट्रपतिपदासाठी भागवत यांनाच शिवसेनेची पहिली पसंती - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेची पहिली पसंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाला भाजपची पसंती असेल तर त्याविषयी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करावी, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 24) येथे सांगितले.

डावे, कॉंग्रेस, संयुक्त जनता दल या विरोधकांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी सर्व पक्षांची सहमती मिळेल, असे शरद पवार यांचे नाव पुढे केले आहे. त्याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, "देशात हिंदुत्वाचे वारे वाहत आहेत. त्यासाठी त्याच विचाराचे मोहन भागवत हे राष्ट्रपतिपदासाठी योग्य आहेत. सर्व सहमतीने शरद पवार यांचे नाव पुढे येत असेल आणि त्याला भाजपची पसंती असेल, तर भाजपच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करावी. तेच पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय घेतील.''

राऊत यांनीच मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे आणले होते; मात्र भागवत यांनी स्वत:च राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची आवश्‍यकता आहे. शिवसेनेकडे सुमारे 25 हजार 893 मते आहेत. त्यामुळे भाजपला शिवसेनेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सर्व मित्रपक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील दरीही कमी झाली आहे.

Web Title: mohan bhagwat first priority for president by shivsena