मोहसीन शेखच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल आयटी इंजिनिअर असलेल्या शेख मोहम्मद मोहसीन सादिक शेख (वय 29, सोलापूर) या तरुणावर हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखचा मृत्यू झाला. जातीय दंगलीतील बाधित अथवा मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार मोहसीन शेखचे वडील सादिक शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी अर्ज केला होता.

Web Title: Mohsin Shaikh Family 10 Lakh Rupees Help