मोखाडा : 27 उमेदवारांची माघार; 65 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Mokhada election
Mokhada electionsakal media

मोखाडा : आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत (Mokhada Nagar panchayat election) आज माघारीच्या दिवशी 27 उमेदवारांनी माघार घेतली असून 65 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (congress) ,बविआ,सिपीएम अशी आघाडी केली असून शिवसेना स्वबळावर (Shivsena own fight) लढणार आहे. तसेच बीजेपी (BJP) व जिजाऊ संघटना यांनी युती झाले असल्याचे बोलले जात असले तरी माध्यमांना त्यांनी अधिकृत माहीत अद्याप दिलेली नाही.

Mokhada election
मुंबई| अंंधेरीत 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5 जण जखमी

सदरची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्टेची केली असून या निवडणुकीत सेना,राष्ट्रवादी, बीजेपी,जिजाऊ संगठना,बविआ यांनी प्रतिष्ठा पणाला लावून कंबर कसली आहे. तसेच हि निवडणूक आमदार सुनील भुसारा यांच्या "होमग्राऊंड"मध्ये असल्याने त्यांनी हि निवडणूक अतिशय प्रतिष्टेची केली आहे.

त्यामुळे पुढील काळात कोण प्रचारात आघाडी घेणार व सत्तेच्या चाव्या कोण खेसून आणणार याबाबत चर्चा रंगली तसेच माघारीच्या दिवशी झालेल्या घोडे बाजाराची चर्चा देखील तितकीच रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com