मोखाडा : आदिवासी नेते व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

शिवसेनेच्या गळाला लागले आदिवासी नेते
Eknath Shinde
Eknath Shindesakal media

मोखाडा : मोखाडा नगरपंचायत निवडणुकीची (Mokhada Nagar panchayat election) रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. आयाराम, गयारामांची सुरूवात झाली आहे. शिवसेनेने (Shivsena election strategy) नगरपंचायतीवरील आपली एकहाती सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. आदिवासी समाजाचे नेते व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नवसु दिघा (Navsu Digha) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ठाणे येथे शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश (Entry in shivsena) केला आहे. बारा आदिवासी पाडे समाविष्ट असलेल्या मोखाडा नगरपंचायतीत, ऐन निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. 

मोखाडा तालुक्यातील आदिवासी  सामाजिक कार्यकर्ते नवसु सोमा दिघा तसेच जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील आदिवासींचे ज्येष्ठ नेते ढवळू जाणू धोंडगा यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवबंधन व भगवा हाती देऊन त्यांचे ठाण्यातील एका कार्यक्रमात, शिवसेनेत स्वागत केले आहे.

यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, तालुका अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ, ऊपतालुकाप्रमुख वासुदेव खंदारे, माजी तालुका प्रमुख  रविंद्र कटीलकर उपस्थित होते. यापुढे शिवसेना यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com