गायक मिका सिंगविरोधात विनयभंगाची तक्रार

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात एका मॉडेलने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

सतत वादात सापडणारा मिका सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. फॅशन डिझायनर असलेल्या एका मॉडेलने मिका सिंगविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने पोलिस तपास करत आहेत. मिका सिंगकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेली असता मिकाने विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यापूर्वी या महिलेने मिका सिंहच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालता होता.

दरम्यान, मिका सिंगनेही वर्सोवा पोलिस ठाण्यात संबधित मॉडेलने धमकी देऊन 5 कोटी रुपये मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Molestation complaint against singer Mika Singh