ओला टॅक्‍सीत तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - तरुणीचा विनयभंग करणाऱ्या ओला टॅक्‍सीचालकाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुरेशकुमार राधेशाम यादव असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार तरुणी ही मूळची कोलकाता येथील आहे. ती दक्षिण मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करते. सोमवारी सायंकाळी तिने चांदिवली येथील मित्राला भेटण्यासाठी नरिमन पॉइंट येथून ओला टॅक्‍सी बुक केली.

प्रवासादरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागले. सुरेशकुमारने तिची विचारपूस करून पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले. ती पुढे बसल्यानंतर सुरेशकुमार तिच्याशी गप्पा मारू लागला. काही वेळाने तिला झोप लागली. झोपेत त्याने स्पर्श करताच तिला जाग आली. सुरेशकुमारने सीट मागे घेताना स्पर्श झाल्याचे सांगितले. त्यानंतर टॅक्‍सी पवईजवळ आली असताना त्याने पुन्हा तिला नकोसा स्पर्श केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तिच्या मित्राला व्हॉट्‌सऍपवरून लोकेशन पाठवले. हिरानंदानी परिसरात ही तरुणी उतरली. तिने मित्राला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी रात्री उशिरा पवई पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सुरेशकुमारला अटक केली. पोलिसांनी टॅक्‍सीही जप्त केली आहे.

Web Title: Molestation of a girl in Ola taxi crime