माणगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

माणगावातील शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

माणगाव (वार्ताहर) : शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची तक्रार रविवारी (ता. १३) माणगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे.

तालुक्‍यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणगावातील भाले गावात राहणारा रामदास वालेकर हा विवाहित असून, त्याने लग्नाच्या भूलथापा देऊन दाखवून ५ नाव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान पीडित मुलीवर अत्याचार केला. कडापे वाडी बस थांबा आणि आजूबाजूच्या परिसरात तिला रात्रीच्या वेळेस तो बोलावत होता. त्याने वेळोवेळी तिच्यावर बळजबरीही केली. त्याच्यापासून ही मुलगी गरोदरही राहिली आहे.

या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून रामदास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रामदास इंगावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरीक्षक कावळे हे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation on minor girl in Mangao