पोलिस अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाकडून विनयभंग; गुन्हा दाखल

Police
Policesakal media

मुंबई: मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिला अधिकारीला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत असे, इतकंच काय तर त्या महिला अधिकाऱ्याचा पाठलागही करायचा. (constable)

Police
आधी भावासाठी जेलमध्ये... आणि आता थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर दावा!

दरम्याल ८ एप्रिल रोजी आरोपी शिपाईने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजचे मेसेज पाठवले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या त्रासाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने संबधित सहकारी पोलिस हवालदाराच्या विरोधात खार पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४(ड), ५०९ सह ६७ माहिती तंत्रज्ञान अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. (Police)

Police
शिवसेना भवनासमोर मनसेचा भोंगा; रामनवमीला नाकावर टिच्चून लावली हनुमान चालिसा

महिला पोलिस शिपायाची छेड अथवा फसवणुकीचा हा काही पहिलाच गुन्हा नाहीये. नुकतीच विलेपार्ले पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षित नसल्याची टिका केली जात असताना दुसरीकडे या घटनेमुळे पोलिस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com