सीएसएमटी स्थानकात तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकात तरुणीच्या विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर या प्रकरणातील चौघांपैकी एकाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. धर्मेश हारके परिहार असे त्याचे नाव आहे.

लोकल प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गर्दीचा फायदा घेत काही जण महिलांना नकोसे स्पर्श करतात. अशीच एक संतापजनक घटना सोमवारी (ता.16) रात्री सीएसएमटी स्थानकात घडली. एक तरुणी मैत्रिणीसोबत पनवेल लोकल पकडण्याकरिता फलाट क्रमांक एकवर जात असताना धर्मेशच्या तीन साथीदारांनी त्या तरुणीला नकोसे स्पर्श केले. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तिघे जण पळून गेले; तर तरुणीने धर्मेशला ओळखून सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Molestation of woman in CSMT Station