लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यातून पैसे गायब

लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यातून पैसे गायब

मुंबई - अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या ऑनलाईन लिंकवर क्‍लिक केल्यामुळे बोरिवली येथील महिला प्राचार्याच्या बॅंक खात्यातून सुमारे सव्वा लाखाची रक्कम गायब झाली आहे. संबंधित व्यक्तीला कोणतीही माहिती दिली नव्हती, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मालाड येथील महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या या महिलेचे एका खासगी बॅंकेत बचत खाते आहे.  ४ जानेवारीला त्यांना अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्या व्यक्तीने आपण बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या बॅंक खात्याचे ‘केवायसी’ करायचे असल्यामुळे संपूर्ण माहिती द्या, अशी मागणी त्या व्यक्तीने केली. त्या वेळी तक्रारदार महिलेने माहिती देण्यास नकार देऊन बॅंकेत जाऊन ही प्रक्रिया करू, असे सांगितले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने ‘केवायसी’साठी बॅंकेत जाण्याची गरज नसून, आपण पाठवलेल्या एका लिंकवर माहिती अपलोड केल्यास सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा निर्वाळा दिला. त्यानुसार तक्रारदार महिलेने त्या लिंकवर क्‍लिक केले. त्यानंतर फक्त पाच मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यातून आधी ४९ हजार, त्यानंतर पुन्हा ४९ हजार आणि अखेरीस १८ हजार असे एकूण एक लाख १७ हजार रुपये काढण्यात आले. या महिला प्राचार्यांनी पुन्हा त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे आढळले. त्यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com