मोनो, मेट्रो रेल्वेची स्थानके एकमेकांना जोडणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई व जवळपासच्या परिसरात प्रवास करताना अधिक जलद व सुखकर प्रवासासाठी एमएमआरडीए मोनो आणि मेट्रोची रेल्वे स्थानके एकमेकांना जोडण्याचा प्रयत्नात आहे.

मुंबई : मुंबई व जवळपासच्या परिसरात प्रवास करताना अधिक जलद व सुखकर प्रवासासाठी एमएमआरडीए मोनो आणि मेट्रोची रेल्वे स्थानके एकमेकांना जोडण्याचा प्रयत्नात आहे. यान्वये मेट्रो 3 मार्गाला घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1, मोनो, तसेच अन्य मेट्रो मार्गांच्या स्थानकांशी जोडण्यात येणार आहे. यामुळे मुंबईच्या एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात अवघ्या काही मिनिटांत पोहचणे शक्‍य होणार आहे. 

मुंबई आणि परिसरात मेट्रोमार्गांचे जाळे तयार झाल्यानंतर प्रवाशांना एका मेट्रोतून उतरल्यावर अन्य मेट्रोमार्गाकडे जाणे जलद व सुखमय होणार आहे. मुंबईकरांची हीच गरज ओळखून कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो 3, मोनो, मेट्रो तसेच उपनगरीय रेल्वेच्या स्थानकाला एकमेकांशी जोडण्यात येणार आहे. कुलाब्यातून सुरू होणारी मेट्रो 3, घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 मार्गाच्या मरोळ स्थानकात जोडली जाणार आहे.

मेट्रो 2 ब हा मार्ग वांद्रे कुर्ला स्थानकात जोडला जाईल. पुढे जाऊन मोनो रेल्वेचे मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी स्थानकही या मार्गाला जोडले जाणार आहे. एमएमआरडीए राबवत असलेल्या मेट्रोचे अन्य मार्गही अशाच प्रकारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात सर्वच मार्ग एकमेकांशी जोडले जाऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, अशी आशा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. 

web title : Mono, Metro rail stations will be connected

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mono, Metro rail stations will be connected