मोनो ठरणार पांढरा हत्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - मोनो रेल्वेचा टप्पा 1 आणि टप्पा 2 यासाठी अपेक्षित खर्च 2 हजार 460 कोटी असून, आता या खर्चात 236 कोटींची वाढ झाली आहे. मोनोची सुरक्षा आणि इतर वाढीव खर्चामुळे मोनो ही पांढरा हत्ती ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आधीच विलंबाने मोनोरेल प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडा सिद्ध झाला असून आता यात वाढीव रकमेची भर पडली आहे.
Web Title: mono railway