मोनोच्या दररोज 40 फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

चेंबूर ते महालक्ष्मीदरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्यामुळे दररोज सरासरी 40 फेऱ्या रद्द होत आहेत. मोनो वेळेवर धावत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.

मुंबई - चेंबूर ते महालक्ष्मीदरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्यामुळे दररोज सरासरी 40 फेऱ्या रद्द होत आहेत. मोनो वेळेवर धावत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.

मोनो रेल्वेचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा 2014 मध्ये सुरू झाला. चेंबूर ते महालक्ष्मी (सातरस्ता) हा दुसरा टप्पा 4 मार्च 2019 रोजी कार्यान्वित झाला. संपूर्ण मार्गावर सुरवातीला दररोज 131 फेऱ्या सुरू होत्या. परंतु, कामकाज बिघडल्यामुळे आता मोनोच्या सरासरी 79 फेऱ्या होत असल्यामुळे दररोज 17 हजार प्रवाशांना फटका बसत आहे. बराच वेळ मोनोची वाट पाहत थांबावे लागत असल्यामुळे प्रवासी बस, रिक्षा, टॅक्‍सीकडे वळत आहेत. त्यामुळे मोनोच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mono Railway 40 Round Cancel