१ सप्टेंबरपासून पुन्हा धावणार मोनो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - मोनोच्या ताफ्यात असलेल्या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने मोनोचा दुसरा टप्पा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे चेंबूर ते सातरस्तापर्यंत मोनो धावण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. डब्यांना आग लागल्यानंतर नऊ महिने बंद असलेली मोनो राणी १ सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार आहे. चेंबूर ते सातरस्ता दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीए सूत्रांकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन मलेशियाची कंपनी स्कोमी व लार्सन टुब्रो करणार आहे. याआधी मोनोचे व्यवस्थापन स्कोमीकडे होते. दहापैकी सहा गाड्या कार्यरत असून उर्वरित दुरुस्तीसाठी यार्डात आहेत. त्या दुरुस्त होऊन डिसेंबरपर्यंत मोनोच्या ताफ्यात दाखल होतील. त्यानंतर दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. ७ नोव्हेंबर २०१७ रोजी म्हैसूर स्थानकात रिकाम्या मोनोच्या डब्याला आग लागली. त्यानंतर त्याची करणे शोधण्यासाठी मोनो सेवा बंद ठेवण्यात आली होती.

आगीची कारणे व उपाययोजना शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानंतर उपाययोजनांची पूर्तता आणि यशस्वी चाचणी पार पडल्यावर एमएमआरडीएने मोनो १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Mono will run again from September 1