ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेल्वेची वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. चेंबूर वाशीनाका मैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल्वे अडकली होती. एक तासापासून अधिक काळ प्रवासी मोनोत अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या.

मोनोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नसल्याची तक्रार नेहमी होत असते. आतादेखील पीआरओ कडून प्रवाशांना कोणतेही उत्तर दिले जात नाहीत. यामुळे प्रवाशांना कोणतीही माहिती मिळत नाहीत म्हणून अडकलेले आणि स्टेशन वरील सर्व प्रवासी या प्रकारामुळे संभ्रमात आहेत. 

ऐन गर्दीच्या वेळेत मोनोरेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आसून सकाळी सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी चाकरमान्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monorail faced technical issue