"मॉन्सूनपूर्व'मुळे मुंबईत दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - मॉन्सूनपूर्व पावसामुळे सोमवारी मुंबईत दाणादाण उडाली. ऐन गर्दीच्या वेळी तिन्ही मार्गांवरील लोकलचा खोळंबा झाला. सीवूड-बेलापूर मार्गावर सायंकाळी 7 वाजता अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर दुसरी वायर फेकल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे विस्कळित झाली होती.

पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, मालाड सब वे येथे पाणी तुंबले. आणखी दोन दिवस सायंकाळी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मुंबईसह राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. रात्री 8 वाजता अचानक सोसाट्याचा वारा आणि विजांसह सरी कोसळू लागल्या. त्यामुळे काही मिनिटांतच मुंबईत दाणादाण झाली. नेहमी 15 ते 17 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे सोमवारी सायंकाळी 23 ते 24 किलोमीटर वेगाने वाहू लागल्याने सर्वांची धावपळ उडाली. मालाड सबवे आणि शीव येथे पाणी तुंबल्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. परतीच्या वाटेवरील नोकरदारांचे मात्र हाल झाले. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे आणि पश्‍चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होती. विलेपार्ले ते अंधेरी स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्याने पश्‍चिम रेल्वे विस्कळित झाली. 

अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर दुसरी वायरी फेकली असेल किंवा ती पडली असावी. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्वरित ती वाहिनी काढून वाहतूक पूर्ववत केली. 
- सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

रात्री 8 ते 9 या वेळेतील पाऊस (मि.मी.) 
- माटुंगा - 43 
- कांदिवली - 46 
- मरोळ - 42 
- विलेपार्ले कुपर रुग्णालय - 45 
- अंधेरी - 46 

39 झाडे कोसळली 
- शहर - 13, पूर्व उपनगर - 5, पश्‍चिम उपनगर - 21 

- पाणी उपसण्यासाठी 17 पंप सुरू 
शहर - 6, पूर्व उपनगर - 7, पश्‍चिम उपनगर - 4

Web Title: Before Monsoon mumbai