बेशिस्त वाहन चालकाकडून 10 कोटीहून अधिक दंड आणि कर वसूल
कल्याण - कल्याण डोंबिवली समवेत आजू बाजूच्या शहरात बेशिस्त आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, नियम धाब्यावर बसवून वाहन चालवीत असल्याचे झाले. वर्षीच्या आरटीओच्या कार्यवाहीत उघड झाले. दोषी वाहन चालकाकडून वर्षभरात दंड आणि कर एकूण 10 कोटीहुन अधिक वसूल करण्यात आला आहे.
कल्याण आरटीओ ने बेशिस्त, बेकायदेशीर वाहन चालकाविरोधात धडक कारवाई केली असून, 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधी मध्ये कारवाई करण्यात आली.
कल्याण - कल्याण डोंबिवली समवेत आजू बाजूच्या शहरात बेशिस्त आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, नियम धाब्यावर बसवून वाहन चालवीत असल्याचे झाले. वर्षीच्या आरटीओच्या कार्यवाहीत उघड झाले. दोषी वाहन चालकाकडून वर्षभरात दंड आणि कर एकूण 10 कोटीहुन अधिक वसूल करण्यात आला आहे.
कल्याण आरटीओ ने बेशिस्त, बेकायदेशीर वाहन चालकाविरोधात धडक कारवाई केली असून, 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधी मध्ये कारवाई करण्यात आली.
बेशिस्त रिक्षा चालक ...
कालावधीत 7 हजार 719 रिक्षा तपासणी करण्यात आल्या यात 1 हजार 256 रिक्षा दोषी आढळून आले. यात 392 रिक्षा चालकांचे परवाना निलंबित केले असून 273 जणांचे लायसन्स निलंबित केले आहे. एकूण 2 कोटी 7 लाख 76 हजार 600 रुपये दंड आणि कर वसूल करण्यात आल्या आहेत.
टॅक्सी
870 टॅक्सी तपासणीमध्ये 131 दोषी आढळून आले. यात 59 जणांचे परवाना निलंबित केले असून 48 जणांचे लायसन्स निलंबित केले आहे. एकूण 3 लाख 94 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खासगी बस मधून अवैध प्रवासी वाहतूक.
यात 1 हजार 327 वाहने तपासण्यात आली यात 200 दोषी आढळून आले. यात 68 जणांचे लायसन्स निलंबित केले असून 72 जणांचे परवाना निलंबित केले आहे. यात 3 कोटी 7 लाख 72 हजार 307 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बस व्यतिरिक्त अवैध प्रवासी वाहतूक...
यात 5 हजार 470 वाहने तपासले यात 843 वाहने दोषी आढळून आले यात 287 परवाने रद्द तर 307 जणांचे लायसन्स निलंबित केले असून यात एकूण 1 कोटी 11 लाख 2 हजार 773 रुपये दंड आणि कर वसूल केले आहे.
शाळकरी विद्यार्थी वाहतूक वाहने...
आरटीओच्या विशेष पथकाने 524 बसेस तपासणी केल्या यात 82 दोषी आढळले यात 30 जणांचे लायसन्स निलंबित केले तर 37 जणांचे परवाना निलंबित केले असून यात 6 कोटी 4 लाख 7 हजार 478 रुपये दंड आणि कर वसूल केला आहे.
बस व्यतिरिक्त 842 वाहने तपासणी केली असता 137 दोषी आढळले यात 61 जणांचे लायसन्स निलंबित केले तर 26 जणांचे परवाना निलंबित केला आहे .तर 51 जणांची वाहन नोंदणी निलंबित केल्या असून एकूण 3 लाख 50 हजार 866 दंड वसुल करण्यात आला आहे .तर 683 रिक्षा तपासणी केल्या असून 109 वाहने दोषी आढळले यात 57 जणांचे लायसन्स निलंबित केले तर 59 जणांचे परवाने निलंबित केले असून 2 लाख 22 हजार 200 रुपये दंड आणि कर वसूल केला आहे.
अवजड वाहने..
भार क्षमते पेक्षा जास्त वाहतूक करणारे 5 हजार 964 वाहने तपासणी केली यात 497 दोषी वाहने आढळून आले यात 6 कोटी 58 लाख 4 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट कारवाई मध्ये 4 हजार 228 वाहने तपासणी यात 538 वाहने दोषी तर यात दंड वसुली 79 हजार रुपये झाली आहे. मोबाईल वापरून वाहन चालविणे 923 वाहन तपासणी यात 132 वाहने दोषी यात 71 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे.
जनजागृती करून ही अनेक वाहन चालक नियम तोडत असून यावर्षी या वाहन चालकाविरोधात कडक धोरण अवलंबून त्यांच्या कडून दंड वसूल सोबत त्यांना रस्ते सुरक्षा आणि नियमाबाबत त्यांना समुपदेशन वर्गाला हजर राहावे लागणार आहे. अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.