मुंबईत नव्या ८०८२ कोरोना रुग्णांची भर; दोन जणांचा मृत्यू

corona update
corona updatesakal media

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या 8082 नवीन रुग्णांची (Corona new patients) भर पडली. मात्र त्यापैकी 7272 (90 टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांपैकी केवळ 574 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले असुन त्यापैकी केवळ 71 रुग्णांना ऑक्सिजन बेडची (oxygen beds) गरज भासली. सध्या पालिकेकडे कोविड बधितांसाठी 30,565 बेड तयार असून त्यातील केवळ 3735 (12.2 टक्के) बेड भरले आहेत. (More than eight thousand new corona patients found in mumbai today)

corona update
नवी मुंबईची मेट्रो सुरु करा; एकनाथ शिंदें यांचे आदेश

आज 622 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,51,358 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सक्रिय रुग्णांची संख्या वाढुन 37,274 इतकी झाली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 138 दिवसांवर खाली आला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.50 इतका वर गेला आहे.

आज 2 कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,379 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दरात घट झाली असून 93 टक्के झाला आहे.आज दिवसभरात 49,283 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,38,14,933 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com