esakal | दुसऱ्या यादीत कट ऑफ कायम
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

दुसऱ्या यादीत कट ऑफ कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऑनलाईन (Online) प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. पहिल्या गुणवत्ता यादीप्रमाणे या वेळी कला शाखेचा अपवाद वगळता नामांकित महाविद्यालयांतील (colleges) विज्ञान (Science), वाणिज्य (commerce) शाखेचा कटऑफही (Cut Off) ८५ ते ९१ टक्केच्या दरम्यान राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कटऑफ घसरला. या यादीनंतरही अद्याप ७३ हजार ६८६ विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळाला नसल्याचेही समोर आले.

मुंबईतील एकदोन महाविद्यालयांचा अपवाद वगळता या वेळीही विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कल हा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे: तर काही महाविद्यालयांमध्ये कला शाखेकडे राहिला. दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळावा यासाठी मुंबई विभागातून एक लाख ३३ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६० हजार ३७ विद्यार्थ्यांनाच प्रवेशाच्या जागा झाल्या. दुसऱ्या यादीत पात्र विद्यार्थ्यांपैकी १३ हजार २८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीची महाविद्यालये मिळाली. या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असेल.

हेही वाचा: मुंबई परिसरात 'ITI' मध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष मोहीम, वाचा सविस्तर

दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी राबवली जाईल. या यादीतही ईडब्लूएस (आर्थिक मागास प्रवर्ग) गटातील उपलब्ध जागांसाठी जास्त अर्ज आलेले नाहीत.

loading image
go to top