आई नव्हे तू वैरीण! एक दिवसाच्या बाळाला सोडून फरार...

आई नव्हे तू वैरीण! एक दिवसाच्या बाळाला सोडून फरार...
आई नव्हे तू वैरीण! एक दिवसाच्या बाळाला सोडून फरार...

नेरळ : कोरोनाच्या काळात माणुसकीचे दर्शन दिसून आले. असे असताना पोटच्या एक दिवसाच्या बाळाला त्याच्याच आईने टाकून दिल्याची घटना नेरळ येथे घडली. त्या मुलाला पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत. 

ही घटना शुक्रवारी (ता. 3 ) पहाटेच्या सुमारास नेरळ कोंबळवाडी येथे घडली. याप्रकरणी नेरळचे पोलीस उपनिरीक्षक तात्या सवांजी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या बाळाचा जीव वाचविणाऱ्या आशा रुके व त्यांचे पती विनोद रुके यांनी बाळाला आपण सांभाळू, अशी भूमिका घेतली आहे.

गेले अनेक वर्षे आम्हाला मूलबाळ नाही. त्यासाठी अनेक दरवाजे ठोठावले; मात्र आम्हाला मुलाचे सुख मिळाले नाही. या बाळाच्या रूपात आम्हाला आमचे भविष्य दिसत आहे. या साठी कायदेशीर प्रक्रिया पार पडण्याची आमची तयारी आहे. 
- आशा रुके, स्थानिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com