वीरमाता-पित्याचाही आर्थिक मदतीवर अधिकार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - देशाच्या सीमेवर धारातीर्थ पडलेल्या हुतात्मा जवानांच्या आर्थिक मदतीत यापुढे त्यांच्या आई-वडिलांचाही 40 टक्‍के हिस्सा राहणार आहे. वीरपत्नीला 60 टक्‍के, तर वीरमाता-पित्याला 40 टक्‍के अशाप्रकारे मदत दिली जाणार आहे.

मुंबई - देशाच्या सीमेवर धारातीर्थ पडलेल्या हुतात्मा जवानांच्या आर्थिक मदतीत यापुढे त्यांच्या आई-वडिलांचाही 40 टक्‍के हिस्सा राहणार आहे. वीरपत्नीला 60 टक्‍के, तर वीरमाता-पित्याला 40 टक्‍के अशाप्रकारे मदत दिली जाणार आहे.

हुतात्मांच्या पत्नीबरोबर वृद्ध माता-पित्यांनाही आर्थिक मदत यापुढे दिली जाणार आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देताना त्यावर त्यांच्या पत्नीचा अधिकार असायचा. यापुढे मात्र त्यांच्या माता-पित्यांचाही या आर्थिक मदतीवर अधिकार असणार आहे. हुतात्मा जवानाच्या पत्नीला एकूण रकमेच्या 60 टक्‍के, वीरमाता आणि वीरपित्याला प्रत्येकी 20 टक्‍के, तर या दोघांपैकी कोणी एकच हयात असल्यास त्यांना 40 टक्‍के, हुतात्मा सैनिक विवाहित असेल; मात्र त्याचे मातापिता हयात नसतील, तरच त्यांच्या पत्नीला 100 टक्‍के रक्‍कम देण्यात येणार आहे. हुतात्मा अविवाहित असेल, तर त्याच्या आई-वडिलांमध्ये समान वाटप केले जाईल. आईवडील हयात नसतील, तर भावंडांमध्ये समान वाटप केले जावे, असे जाहीर करण्यात आले आहे.

एप्रिल 2016 पासून पुढील पाच वर्षांत धारातीर्थ पडलेल्या जवानांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत दरवर्षी 50 हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. सध्या जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या वर्षी एक एप्रिलनंतर हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. यानंतरची पुढील पाच वर्षे प्रत्येक आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांची वाढ होणार आहे. 2020 ते 2021 या वर्षी 10 लाख रुपये दिले जाणार असल्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

Web Title: mother father financial help rites