प्रेमसंबधांमुळे आईनेच केली मुलीची हत्या

प्रेमसंबधांमुळे आईनेच केली मुलीची हत्या

मुंबई : मुलीची हत्या केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी ४० वर्षीय महिलेला अटक केली. तिने ओढणीच्या साहाय्याने आपल्या २३ वर्षीय मुलीची हत्या केली. मुलीचे एका व्यक्तीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध असल्यामुळे तिने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर आईने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन हा सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

निर्मला अशोक वाघेला (२३) असे मृत मुलीचे नाव आहे. पायधुनी येथील संत तुकाराम मार्ग येथे रविवारी (ता. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. निर्मलाचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली होती. मात्र, या प्रेमाला मुलीची आई पापू वाघेला (४०) हिचा विरोध होता. 

तिने निर्मलाला घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला होता. मात्र, निर्मलाने आईशी वाद घालून घरातून कपडे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. समजावून सांगूनदेखील मुलगी ऐकत नसल्याने तिच्या आईने निर्मलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या आईने कोणताही विचार न करता, निर्मलाचा ओढणीने गळा आवळला. त्यामुळे काही क्षणातच निर्मला बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, उपचाराअगोदरच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

दुसरीकडे आईने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन सर्व गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली. याप्रकरणी हत्येत वापरण्यात आलेली ओढणी जप्त करण्यात आली असून इतर पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस 
करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com