मुलीला वाचवताना साप चावला, तरीही आईने सापासह मुलीला नेलं रुग्णालयात

-------.jpg
-------.jpg

मुंबई : कठीण प्रसंगी आई आपल्या मुलांसाठी स्वतःचा जीव ही धोक्यात घालते याच जिवंत उदाहरण धारावीमध्ये बघायला मिळालं.धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीला साप चावल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आईला ही सापाने दंश केला. मात्र स्वतःला साप चावल्यानंतर या आईने आपल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तिच जीव वाचवला.

धारावीमधील महाराष्ट्र नेचर पार्क जवळील राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबावर हा प्रसंग ओढवला असून सुलताना खान अस या धाडशी आईच नाव आहे. सुलताना खान (वय 32) या आपली मुलगी तेहसीन खान (वय 18) हिच्या सोबत राहतात. काल सुरू असलेल्या पावसामुळे सुलताना यांच्या घरामध्ये दीड फुटी विषारी साप शिरला आणि त्याने सुलताना यांची मुलगी तेहसीन यांच्या हाताला दंश केला.

हाताला दंश केल्यानंतर तेहसीनने जोराने किंचाळत सापाला दूर लोटण्याचा प्रयत्न केला असता सापाने चवताळून तेहसीनला पुन्हा एकदा दंश केला. सापाने दोनदा दंश केल्याने तेहसीन जोरात किंचाळली. तेहसीनच्या किंकाळीने तिची आई सुलतानाच्या हा सारा प्रकार लक्षात येताच ती लागलीच या सापावर तुटून पडली आणि तिने हाताने पकडून या सापाला दूर फेकण्याचा प्रयत्न केला असता सापाने सुलताना यांना ही दंश केला. सापाने दंश केल्यानंतर ही सुलताना यांनी या सापाला मात्र घट्ट पकडून ठेवले.

सुलताना यांनी लागलीच एका हातात साप आणि दुसऱ्या हाताने आपली मुलगी तेहसीन हिला खेचत घराबाहेर आणले आणि टॅक्सीत बसून थेट सायन रुग्णालय गाठले. सायन रूग्णालयातील डॉक्टरांनी दोघा माय लेकींना आयसीयू मधे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. आणि सुलतानाने आणलेल्या सापाला एका बरणीत बंद केले. पशुवैद्यकीय विभागातील डॉक्टरांनी येऊन सापाला तपासलं असता हा साप विषारी असल्याचे स्पष्ट झाले. सापाच्या विषाची खात्री झाल्यानंतर डॉक्टरांनी या दोघी मायलेकींवर उपचार सुरू केले आहेत. तेहसीन ही आयसीयू मध्ये दाखल असून दोघींच्या जीववरील धोका टळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com