मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

मुंबई - आपल्या चार वर्षांच्या मुलाला गळफास लावून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला येथे घडला. अनुजा वंजारी असे तिचे नाव आहे. पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याच्या तक्रारीवरून विनोबा भावेनगर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला.

विनोबा भावेनगर पोलिस ठाण्याच्या शिंगारेवाडी परिसरात अनुजा या त्यांचे पती दीपक आणि चार वर्षांचा मुलगा श्री याच्यासोबत राहात होत्या. लग्नानंतर दीपक हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे नशेत तो अनुजा यांना वारंवार त्रास देत असे. अनेकांकडून त्याने पैसे उधारीवर घेतल्यामुळे अनेक जण पैसे मागण्यासाठी घरी येत होते. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर अनुजाने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी आत्महत्या करण्यापूर्वी अनुजाने तिच्या घरच्यांशीही बोलणे केले. घरच्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र अनुजाने कोणाचेही न ऐकता घरी कुणी नसताना मंगळवारी सुरुवातीला आपल्या चार वर्षांच्या मुलाला गळफास दिला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत तिने स्वतःचे आयुष्य संपवले. 

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले. अनुजाचा पती दीपकला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com