Mumbai Crime: मुंबईतील क्रूर प्रकार! जन्मदात्या आईनेच ३९ दिवसांच्या बाळाला १४व्या मजल्यावरून फेकलं

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे
Mumbai Crime
Mumbai CrimeEsakal

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंडमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या आपल्या बाळाला इमारतीच्या 14 मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये ३९ दिवसांच्या बाळाला मृत्यू झाला आहे. इमारतीवरुन खाली फेकल्यानंतर हे बाळ एका दुकानावर पडले. सकाळी संपुर्ण प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

३९ दिवसांच्या बाळाची आई तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावाखाली होती. यातूनच तीने आपल्या बाळाची हत्या केल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील मुलुंड येथील निळकंठ अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. मनाली मेहता ही महिला सुरतहून मुलुंडमध्ये आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली असल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

मनालीच्या 39 दिवसांच्या बाळावर तिच्या वडिलांचा फार जीव होता. त्यामुळे या बाळाला पाहताच तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती. आपल्या वडिलांच्या निधनामुळे मनाली मानसिक तणावाखाली होती. बाळाला तिचे आजोबा बोलवत आहेत अशी मनाली कुटुंबातील इतरांना सांगत होती. मात्र कुटुंबियांनी तिची समजूत काढली.

Mumbai Crime
NCP: शरद पवारांनी सेनापती गमावला? एका खासदाराचे आणि आमदाराचे अजित पवारांना समर्थन?

त्यानंतर काल (गुरुवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मनालीने चौदाव्या मजल्यावरून बेडरूमची खिडकी उघडली आणि 39 दिवसांच्या बाळाला खाली फेकून दिलं. हे बाळ इमारतीच्या खाली असलेल्या एका दुकानाच्या छतावर पडली होती.(Latest Marathi News)

सकाळच्या वेळी इमारतीतील एका रहिवाशाने दुकानाच्या छतावर एका लहान मुलीचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाचा मृतदेब ताब्यात घेतला आणि परिसरात चौकशी सुरु केली. चौकशीनंतर हे बाळ मनालीचे असल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Crime
Rohit Pawar: 'सही कर नाहीतर...', अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू; रोहित पवारांचा आरोप

दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर मनाली प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं समोर आलं. तर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचा पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. तर तिचे पहिले मूल हे आठ महिन्यानंतरच मृत पावलं होतं. त्यापाठोपाठ वडिलांचे निधन झाल्यानंतर ही तिची दुसरी मुलगी होती.(Latest Marathi News)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com