आईच्या 'हाय हिल्स'ने घेतला बाळाचा जीव

सुचिता करमरकर
सोमवार, 7 मे 2018

कल्याण : उंच टाचेची चप्पल घालताना तोल गेल्याने खिडकीजवळ असलेल्या आईच्या हातून खाली पडून बाळाचा अंत झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरुन हे बाळ खाली पडले. या घटनेने उल्हासनगरच्या शेख कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

उल्हासनगरमधील धोबी घाट परिसरात राहणारे हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी कल्याणमधील मातोश्री कार्यालयात आले होते. समारंभ संपवून ते परत निघाले होते. आई फेमिदाने आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन उंच टाचेची चप्पल घालण्याचा प्रयत्न केला. उंच टाचेच्या चप्पलची फारशी सवय नसल्याने तिचा तोल गेला. दुर्दैवाने ती खिडकीजवळ असल्याने तिच्या हातातील सहा महिन्यांचे तिचे बाळ हातातून खाली पडले. त्वरित बाळाला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. सहा महिन्यांच्या मोहम्मदच्या मृत्यूने शेख कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Web Title: mother's high hills takes baby's life he died

टॅग्स